Ladka Bhau Yojana 2024
Ladka Bhau Yojana 2024 | माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक सुवर्णसंधी या संधीचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर हा संपूर्ण लेख वाचा.
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने काढली आहे म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील युवा तरुणांना त्यांच्या कौशल्य विकसित करून देण्याचे काम या योजनेमार्फत आपले महाराष्ट्र सरकार करत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 35 वर्ष या वयोगटातील सर्व उमेदवार म्हणजेच तरुणांना मोफत मध्ये कौशल्य प्रशिक्षण दिले जाते व त्यांना पुढील व्यवसायासाठी किंवा शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
Ladka Bhau Yojana 2024 उद्देश
- आपल्या महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
- आपल्या महाराष्ट्रातील युवकांना म्हणजेच तरुणांना रोजगार या योजनेमार्फत उपलब्ध करून देणे.
- महाराष्ट्रातील युवकांमध्ये एक कौशल्य कला निर्माण करणे.
Ladka Bhau Yojana 2024 आटी.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 35 वर्ष या दरम्यान असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
- उमेदवाराचे शिक्षण किमान १२ पास असणे गरजेचे आहे. (पदवी, पदवीत्तर पदवी, डिप्लोमा धारक हे सर्व उमेदवार सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरतात.)
- इयत्ता 12 चालू आहे व त्या आत मधील शिक्षण घेत आहेत असे उमेदवारी या योजनेसाठी अपात्र ठरतात.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड व बँक खाते असणे गरजेचे आहे (आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असावे)
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे रोजगार नोंदणी क्रमांक असणे गरजेचे आहे. ( रोजगार नोंदणी क्रमांक हा तुम्हाला कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या कार्यालयात नोंदणी करून दिला जातो)
Ladak Bhau Yojana प्रमुख घटक
- उमेदवारांना सहा महिन्याचे मोफत मध्ये प्रशिक्षण दिले जाते.
- उमेदवाराची निवड झाल्यानंतर प्रशिक्षण काळात उमेदवाराच्या पात्रतेनुसार दर महिन्याला Stipend पगार देण्यात येतो. (पदवीधर उमेदवारांना दर महिन्याला 10,000/-)
- प्रशिक्षणाचे ठिकाण हे शासकीय निमशासकीय किंवा महामंडळ व उद्योग स्टार्ट ॲप्स इत्यादी ठिकाणी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते.
- उमेदवाराच्या प्रशिक्षणानंतर एक वर्षाची apprenticeship (कामाला जोडणे) संधी देण्यात येते.
Ladka Bhau Yojana अर्ज कसे करावे.
- मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना अजून सुरू झालेली नाही महाराष्ट्र शासनाच्या घोषणे नुसार लवकरच अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
- मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना याचा अर्ज कदाचित ऑनलाईन स्वरूपात स्वीकारला जाण्याची शक्यता आहे.
- महाराष्ट्र सरकारच्या मुख्य वेबसाईटवर या योजनेची घोषणा लवकरच करण्यात येईल असे माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेले आहे.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
महत्त्वाची सूचना.
- आपल्या संपूर्ण लेखा मधील माहिती ही वृत्तपत्र व सोशल मीडिया या माध्यमातून एकत्र करून सांगितलेली आहे ही योजना अजून पूर्णपणे अमलात आणलेली नाही यामध्ये काही बदल सुद्धा होऊ शकतात.